मुखेड l परभणी जिल्ह्यातील सेलु येथे दि. 1 फेब्राुवारी 2025 रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा व पत्रकारांचा मेळावा होणार असुन या मेळाव्यास मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाश दादा कांबळे व नांदेड जिल्हाध्यक्ष संतोषजि पांडागळे यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड यांनी दिली आहे.

सेलु येथील श्री साई नाटय मंदिरात हा मेळावा होणार असुन यामध्ये आदर्श जिल्हा पत्रकार संघाचे वितरण व पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. या सोहळयाची पाहणी सुध्दा प्रमुखांनी काही दिवसापुर्वी करण्यात आली असुन सेलु मराठी मराठी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे.

पत्रकारिता क्षेत्रात येणाया अडीअडचणी व त्यावर उपया तसेच पत्रकार संरक्षण कायदा यासह प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन, पत्रकारावर होणारे हल्ले, पत्रकारांना संरक्षण, पत्रकारिता व सामाजिक वसा यासह विविध बाबीवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे.

या कार्यक्रमास राज्यातील विविध भागातून मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष, पत्रकार बांधव विविध मान्यवर सहभागी होणार आहेत.या भव्य मेळाव्यास मुखेड तालुक्यातूनही मोठया संख्येने पत्रकार बांधव या ठिकाणाी सहभागी होणार असल्याचेही डोईजड यांनी सांगितले.