Selu ; सेलु येथील मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यास मुखेड तालुक्यातील पत्रकार बांधव जाणार – डोईजड
मुखेड l परभणी जिल्ह्यातील सेलु येथे दि. 1 फेब्राुवारी 2025 रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा व पत्रकारांचा मेळावा होणार असुन या मेळाव्यास मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाश दादा कांबळे व नांदेड जिल्हाध्यक्ष संतोषजि पांडागळे यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड यांनी दिली आहे.
सेलु येथील श्री साई नाटय मंदिरात हा मेळावा होणार असुन यामध्ये आदर्श जिल्हा पत्रकार संघाचे वितरण व पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. या सोहळयाची पाहणी सुध्दा प्रमुखांनी काही दिवसापुर्वी करण्यात आली असुन सेलु मराठी मराठी पत्रकार संघा...
