किनवट, परमेश्वर पेशवे l रस्त्यांमधील अपघात टाळण्यासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन किनवटचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी केले. किनवट आगारा तर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षितता मोहीम च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्यामार्फत देशातील सर्व वाहतूक उपक्रमांमध्ये दिनांक ०१ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीम राबवण्याच्या सूचना प्राप्त आहेत.

त्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात रस्ता सुरक्षितता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन म्हणून किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आगार प्रमुख यशवंत खिल्लारे, वाहतूक पोलीस अनंतवार, साईनाथ मुंडे,गजेंद्र दासरवार यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना बिर्ला म्हणाले की, अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण तसेच लवकर निघाल्यास कुठेही अपघात होणार नाही चालकांना कुठलाही मानसिकतान नसावा व टेन्शन फ्री वाहन चालवावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दिगांबर कोंडे यांनी केले.यावेळी गंगाय्या सटलावार,ढगे, साईनाथ मुंडे,ठाकुर, सुभाष भंडारवार, शंकर ताडेवार, गजेंद्र दासरवार, हनुमनलू नारलेवार , सुधीर डूबेवार इत्यादी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.