लोहा। लोहा तालुक्यातील ज्या-ज्या गावात जलजीवन योजनेतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या त्या गावातील सरपंच, सदस्य ग्राम विकास अधिकारी यांनी तक्रारी केल्या. योजनेत चुकीचे सर्वेक्षण, अर्ववट व थातूरमातूर काम, गुतेदारांची दंडेलशाही अशा तक्रारी पाहता योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होईल तसेच जिल्हाधिकारी, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा व तालुका स्तरावरील संबधित अधिकारी ,गुतेदार यांची २१ किंवा २२ रोजी जिल्ह्यावर बैठक आम्ही दोन्ही आमदार घेणार असून ज्या गावातयोजना अपूर्ण आहे ते पूर्णत्वास नेणे व . गावाला पाणी मिळाले पाहिजे. गैरव्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा यथे विभागाला फटकारले.

लोहा तालुक्यातील सर्व गावांच्या संभाव्य पाणी प टंचाई निवारणाची बैठक शहरातील के. के., मंगल कार्यालयात १३ रोजी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, याची विशेष उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी सभापती आनंदराव पाटील हंसराज पाटील बोरगावकर , माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील साहेबराव काळे, बालाजी पाटील कदम छत्रपती धुतमल, करीम शेख, माजी सभापती , खुशालराव पाटील पांगरीकर दता वाले, मारुती पाटील सरपंच सुनील मोरे, बीडीओओडेराघो, पाणी पुरवठा उपअभियंता वाडीकर जिप, बांधकाम उपअभियंता एस. एस. राठोड, उपअभियंता मोहन पवार , भूजल सर्वेक्षण अभियंता राठोड, विद्युत मंडळाचे अभियंता स्वामी, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे ,दिनेश तेलंग शिवसेना तालुका प्रमुख ,मिलिंद पवार ,ओएस वाघमारे, प्रशासन अधिकारी चोरमले ,बी जी मुंडे , हरिभाऊ चव्हाण गायकवाडविविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बैठकीस मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील पाच वर्षात जी तालुक्यातील प्रशासनाला मरगळ आली होती. ती आता कर्मचारी-अधिकारी यांनी दूर करावी, गावात पुढील २०-२५ वर्षाचा विचार करून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या पण त्या गावांना पाणीच मिळेत नसेल तर काय फायदा (?) . जलजीवन योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होईल.

तसेच जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा विभागाचे जिल्हास्तरावरील अधिकारी, तसेच ,एसडिओ तहसीलदार ,, बीडीओ. व तालुकास्तरीय पाणीपुरवठा संबंधित अधिकारी,योजनेचे गुतेदार ग्रामविकास अधिकारी यांची २१ की २२ तारखोला नांदेड येथे बैठक होईल. त्यात जल जीवन योजनेच्या आढावा घेण्यात येईल व आम्ही दोन्ही आमदार उपस्थित राहणार आहोत असे सांगितले. त्यांनी मतदार संघातील गावनिहाय पाणी टंचाई आढावा घेतला.

नादेड दक्षिण चे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी पाणी पुरवठा विभागाला चांगलेच घोरेवर धरले. त्यांच्या मतदार संघानहिल गावांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविक बीडीओ डी के आडेराघो यांनी केले पाणीप्रमुख उपअभियंता श्री वाडेकर यांनी गावनिहाय आढावा सांगितला. संचलन बी.डी. जाधव यांनी केले, तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच प्रतिनिधी, सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.