Mla Pratap Chikhalikar ; लोहा तालुक्यातील जलजीवन योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होणार- आ. चिखलीकर
लोहा। लोहा तालुक्यातील ज्या-ज्या गावात जलजीवन योजनेतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या त्या गावातील सरपंच, सदस्य ग्राम विकास अधिकारी यांनी तक्रारी केल्या. योजनेत चुकीचे सर्वेक्षण, अर्ववट व थातूरमातूर काम, गुतेदारांची दंडेलशाही अशा तक्रारी पाहता योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होईल तसेच जिल्हाधिकारी, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा व तालुका स्तरावरील संबधित अधिकारी ,गुतेदार यांची २१ किंवा २२ रोजी जिल्ह्यावर बैठक आम्ही दोन्ही आमदार घेणार असून ज्या गावातयोजना अपूर्ण आहे ते पूर्णत्वास नेणे व . गावाला पाणी मिळाले पाहिजे. गैरव्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा यथे विभागाला फटकारले.
लोहा तालुक्यातील सर्व गावांच्या संभाव्य पाणी प टंचाई निवारणाची बैठक शहरातील के. के., मंगल कार्यालयात १३ रोजी आ. प्रतापराव पाटील...
