नांदेड| येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे शुक्रवार दिनांक 27/12/24 रोजी विद्यापीठातील पीजी विभागातर्फे आरआरसी बैठकीच्या आयोजन केले होते शिक्षण शास्त्र शारीरिक शिक्षण राज्यशास्त्र आणि सायन्स संशोधक विद्यार्थ्यांना साधी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली नसल्याने कित्येक विद्यार्थ्यांना चक्क जमीनीवर बसाव लागले आहे. या विद्यापीठ प्रशासनाच्या दिरंगाई बद्दल सिनेट सदस्य तथा विद्यार्थी प्रतिनिधी डॉ.महेश मगर यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार दिनांक 27 /12 2024 रोजी विद्यापीठातील पिजि विभागातर्फे पिएचडी म्हणजेच डॉक्टरेट करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी आर.आर.सी. बैठकीचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते यात अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांना सहभाग होता परंतु विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसण्यासाठी कोणतीही आसन व्यवस्था करण्यात आली नव्हती त्यातही कित्येक विद्यार्थिनीना अक्षरशा जमिनीवर बसण्याची वेळ आली होती ही खेदाची बाब आहे.
तसेच अनेक विद्यार्थ्यांनीनी सोबत त्यांचे लहान बाळ होतं व त्या बाळाचेही बेहाल झाले असे असतांनाही प्रशासनाला याचे भान नाही यावरून सिनेट सदस्य डॉक्टर महेश मगर यांनी कुलगुरू मोहदयांना परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर विद्यार्थ्यांना व विद्यार्थींनींसाठी काही प्रमाणात खुर्च्याजी व्यवस्था करण्यात आली. परंतु ही बाब संशोधन करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना अशा प्रकारची वागणुक विद्यापीठ प्रशासन देत असेल ही खेदाची बाब आहे याचा मी पदवीधराचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो असे तिव्र मत सिनेट सदस्य तथा विद्यार्थी प्रतिनिधी डॉ.महेश मगर यांनी व्यक्त केले आहे.