नांदेड l नांदेड जिल्हा भावसार समाज युवा मंडळ नांदेड तर्फे १६ वा उपवधू वर परिचय मेळावा दिनांक २३ मार्च २०२५ रोजी, ओम गार्डन येथे संपन्न होणार आहे .मेळाव्यासाठी राज्य व परराज्यातून हजारोच्या संख्येने भावसार समाजातील उपवधूवर व पालक उपस्थित राहणार आहेत .
नांदेड जिल्हा भावसार समाज अध्यक्ष गंगाधरराव बडवणे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , बैठकीमध्ये सर्वानुमते उप वधू वर परिचय मेळावा कार्यकारणी जाहीर करण्यात आली .श्रीमंत भाऊसाहेब रंगार गल्ली, विठ्ठल मंदिर,येथे कोर कमिटीच्या माध्यमातून खालील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे .अध्यक्ष :गिरीशजी सुरेशराव बुलबुले कार्यकारी अध्यक्ष :गंगाधरराव कोंडीबा बडवणे. सचिव : देविदास चिमणाजीराव बुलबुले. कोषाध्यक्ष :प्रवीण प्रभाकर गंडरघोळ ,उपाध्यक्ष : १-सुरेश नरसिंगराव गोजे, २-अनिरुद्ध नृसिंहराव दांडगे,३-सागर सुभाषराव बुलबुले ,४-प्रमोद दिगंबरराव हिबारे ,सहसचिव : १-शशिकांत पंढरीनाथ भोकरे ,२- दत्तात्रय राघोजी गर्जे,३- दत्तात्रय कोळेकर,४- सौ.कल्पना रमेशराव पुरणाळे, व समिती प्रमुख म्हणून अर्थ समिती प्रमुख सूर्यकांत दत्तोपंत टने,स्वागत समिती प्रमुख वसंतराव मारोतराव कंकाळ,समन्वय समिती प्रमुख प्रभाकर गंगाधरराव पेठकर,भोजन समिती प्रमुख विजय भायेकर, प्रसिद्धीप्रमुख संजय रघुनाथ पेटकर व सल्लागार म्हणून प्रफुल्ल बळीराम बडवणे, सुभाष राजेंद्रराव बुलबुले, लक्ष्मीकांत गणपतराव माळवदकर ,यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .
या उप वधू वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने भावसार समाजातील उपवधूवरांची माहिती संकलित करण्यात येणार असून, सदर माहिती स्मरणिका रूपाने प्रकाशित करण्यात येणार आहे .
मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या समाज बांधवांना मेळाव्याच्या दिवशी सदर स्मरणिका हातात भेटावी म्हणून स्मरणिकेचे प्रकाशन, एक दिवस पूर्वीच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून ,त्या क्षणापासूनच सदर स्मरणिका विक्रीस उपलब्ध राहणार आहे .
भावसार समाजातील उपवधूवरांनी दिलेल्या लिंक वर आपला बायोडाटा ऑनलाइन पद्धतीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन ,अध्यक्ष गिरीश बुलबुले यांनी केले आहे .सदर लिंक ही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे . या मेळाव्यास महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश,तेलंगाना, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश,उत्तरप्रदेश आदि राज्यातून उप वधू वर व त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत .