Bhavsar Samaj ; भावसार समाज उप वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन – NNL
नांदेड l नांदेड जिल्हा भावसार समाज युवा मंडळ नांदेड तर्फे १६ वा उपवधू वर परिचय मेळावा दिनांक २३ मार्च २०२५ रोजी, ओम गार्डन येथे संपन्न होणार आहे .मेळाव्यासाठी राज्य व परराज्यातून हजारोच्या संख्येने भावसार समाजातील उपवधूवर व पालक उपस्थित राहणार आहेत .
नांदेड जिल्हा भावसार समाज अध्यक्ष गंगाधरराव बडवणे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , बैठकीमध्ये सर्वानुमते उप वधू वर परिचय मेळावा कार्यकारणी जाहीर करण्यात आली .श्रीमंत भाऊसाहेब रंगार गल्ली, विठ्ठल मंदिर,येथे कोर कमिटीच्या माध्यमातून खालील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे .अध्यक्ष :गिरीशजी सुरेशराव बुलबुले कार्यकारी अध्यक्ष :गंगाधरराव कोंडीबा बडवणे. सचिव : देविदास चिमणाजीराव बुलबुले. कोषाध्यक्ष :प्रवीण प्रभाकर गंडरघोळ ,उपाध्यक्ष : १-सुरेश नरसिंगराव गोजे, २-अनिरुद्ध नृसिंहराव दांडगे,३-सागर सुभाषराव बुलबुले ,४...
