Wednesday, May 13

Tag: External assessment conducted

Health News : कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथे एक्सटर्नल असेसमेंट संपन्न

Health News : कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथे एक्सटर्नल असेसमेंट संपन्न

आरोग्य, नांदेड
नांदेड| कॉलिटी अश्युरन्स अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कायाकल्प कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ (ता. कंधार, जि. नांदेड) येथे एक्सटर्नल असेसमेंट यशस्वी-रीत्या पार पडले. लातूर विभागीय असेसर टीमने २४ मार्च रोजी सखोल पाहणी करत विविध विभागांचा आढावा घेतला. या पाहणीसाठी डॉ. हरेश्वर सूळे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवना, जि. लातूर) आणि डॉ. श्यामसुंदर लोखंडे (गुणवत्ता आश्वासन समन्वयक, जि. नांदेड) उपस्थित होते. त्यांचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे व डॉ. सागर तातोडे यांनी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी पार पडली. यावेळी असेसर टीमने रुग्णालयाच्या बाह्य परिसरातील स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, आंतररुग्ण विभाग, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया विभाग, लसीकरण विभाग तसेच महात...
error: Content is protected !!