नांदेड| मलकापुर, शहर जिल्हा बुलढाणा येथील पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगार मनोजसिंघ सिंकदरसिंघ टाक, वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. म्हाडा कॉलनी, मलकापुर ता. मलखापुर जि. बुलढाणा यास वजीराबाद गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांकडुन अटक करून धडक कारवाई करण्यात आली आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुक व सार्वत्रीक विधानसभा च्या अनुषंगाने सर्व प्रभारी अधिकारी यांना गुन्हयात फरारी व पाहीजे आरोपी व एन.बी.डब्लु वॉरंट मधील आरोपीताचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 13.11.2024 रोजी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना माहीती मिळाली की, पोलीस ठाणे मलकापुर शहर जि. बुलढाणा येथे दिनांक 01.09.2024 रोजी नमुद घटणा तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी मनोजसिंघ सिंकदरसिंघ टाक, वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. म्हाडा कॉलनी, मलकापुर ता. मलखापुर जि. बुलढाणा याने यातील फिर्यादी पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार हे त्यांचे शासकीय कर्तव्य बजावीत असताना आरोपीने हातात धारदार शस्त्र बाळगुन फिर्यादी व पोलीस अमलदार यांचे वर धारदार लोखंडी तलवारीने जिवे ठार मारण्याचे उदेशाने वार केला.
तो वार फिर्यादीने चुकविला असता आरोपी फिर्यादीचे मागे लागल्याने फिर्यादी पडल्याने फिर्यादीचे उजव्या पायाला, उजव्या खांदयाला दुखापत झाली. यावेळी आरोपी याने पुन्हा मोटारसायकल पकडुन असलेले पोकॉ/नसेर शेख यांच्यावर जिवघेणा तलवारीचा वार केला असता त्यांनी मोटार सायकल जागेवरच पाडुन बाजुला झाले व वार चुकवला तेव्हा आरोपी मनोजसिंघ टाक हा पुन्हा त्यांना तलवारीने मारण्यास धावला असता सपोनी ईश्वर वर्गे यांचे आदेशाने फिर्यादीचे सोबत असलेले पोकॉ/शुभंम ठाकरे यांना त्यांचे ताब्यातील एस.एल.आर. रायफल मधुन फिर्यादीचा व पोलीस अमलदार यांचा जिव वाचविण्याकरीता हवेत गोळीबार करण्यास सांगीतले. त्यांनी रायफल मधुन एक रॉऊड फायर केला तरीसुदा आरोपी हा तलवार घेवुन फिर्यादीचे मागे धावल्याने त्यास रोखण्याकरीता व बचाव करण्याकरीता पुन्हा दोन राऊड हवेत गोळीबार केला.
यावेळी आरोपीने पोलीस अमलदारावर दगडफेक करुन फिर्यादीला, सपोनी वर्गे यांचे उजव्या पायाला व पोकॉ/ नासीर शेख यांना उजव्या हाताला लागल्याने दुखापत झाली व आरोपी तेथुन पळुन गेला. फिर्यादी पोलीस अमलदार यांनी त्यांचा पाठलाग केला असता यातील आरोपी सौ. अनिता मनोजसिंघ टाक व आरोपी जमुनाबाई अजितसिंघ धोंड दोन्ही राहणार म्हाडा कॉलनी मलकापुर यांनी फिर्यादीस अटकाव करुन मनोजसिंघ टाक याला पळवुन जाण्यास मदत केली. वगैरे तक्रारी वरुन नमुद प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे व यातील मुख्य आरोपी मनोजसिंघ सिंकदरसिंघ टाक, हा नांदेड गुरुद्वारा परीसरात असल्याची गुप्त बातमी दाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री परमेश्वर कदम यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील वरील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी नमुद आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस अधिकारी यांना माहीती देवुन अवगत करण्यात आले आहे.
सदर आरोपी विरुध्द गुन्हेगारी अभिलेखाची माहिती घेता जिल्हा बुलढाणा व जळगाव मध्ये त्याचे विरुध्द, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत करणे, घातकशस्त्र तसेच अग्नीशस्त्र बेकायदेशीर ताब्यात बाळगणे असे एकुण 15 गुन्हे दाखल आहेत. पोलीस ठाणे वजिराबाद पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांचे कौतुक केले आहे.