भारत भूमिवर पंधराव्या शतकात शीख धर्म उदयास आला. शीख धर्माचे प्रवर्तक आणी पहिले गुरु, श्री गुरु नानक देवजी यांचे सन 1469 मध्ये रायभोय की तलवंडी येथे महता कालू (कल्याणचंद) यांच्या घरी अवतरण झाले. त्यांच्या आईचे नाव माता तृप्ताजी असे होते. नानक यांनी संतत्व धारण केले आणि अध्यात्मिक क्षेत्रात एक उत्क्रांती घडवून आणली. त्यांनी आपल्या उपदेश आणि वाणीच्या माध्यमातून युक्तिवाद प्रस्तुत केला की, या ब्रह्माण्डात मानव धर्म, हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. या ब्रह्माण्डाचा स्वामी एकच आहे आणी तो परम पिता परमेश्वर आहे. गुरुजींनी भाष्य केले, “एक पिता हम एकस के बारीक.”
गुरु नानक यांनी परमेश्वराची निष्काम भक्ती केली. त्यांनी मनुष्य हा 84 लक्ष योनितून श्रेष्ठ योनी असल्याचे प्रचार केले. ज्याकाळात गुरुजींनी मानवतावाद आणी बंधुत्व अशा संकलना लोकांपुढे मांडल्या त्या परिवर्तन घडवणाऱ्या होत्या. गुरुजींनी जीवन जगण्यासाठी तीन सुत्रं दिली. शीख जीवनशैलीत ‘नाम जपो’, ‘किरत करो’ आणि ‘वंड छको’ हे तीन सुत्रं आहेत. परमेश्वराचे नियमित स्मरण म्हणजे नाम जाप होय. कष्टाची कमाई खाणे म्हणजे किरत कमाई होय. आणी आपल्या कमाईतील काही भाग वाटून खाणे किंवा लंगर सारख्या उपक्रमावर खर्च करणे यास वंड छको असे म्हंटले गेले आहे. नानक यांनी सत्यात परमेश्वराचा वास असतो असे ठामुन सांगितले.
नानकांचे जीवन सुत्रं आणी संकल्पना सामान्य लोक मान्य करू लागले. गुरु नानक यांचा भक्तीचा मार्ग सोयीस्कर असल्यामुळे त्यांच्या पाठी मागे मोठा भक्तप्रवाह निर्माण झाला. त्यांची कीर्ति वाढत गेली आणी पुढे चालून भरतभूमीवर शीख (सिख) धर्म उदयास आला. शीख शब्दाचा नेमका अर्थ आत्मसात करणे किंवा सतत शिकत जाणे असा होतो. नानक यांनी कमी वयातच संस्कृत, अरबी, फारसी सारख्या भाषा अवगत केल्या होत्या. त्यांनी देश – विदेश भ्रमण करून विविध धार्मिक केन्द्राना भेटी दिल्या. तसेच वेगवेगळ्या जातींच्या संतांची, महापुरुषांच्या वाणीचे संकलन देखील केले. संकलित केलेल्या वाणीचे पुढे श्री गुरु ग्रन्थसाहेब या धर्मग्रंथात समावेश करण्यात आले.
गुरु नानकदेव यांच्या काळात आपल्या भारत देशावर परकीय शक्तींचे सतत अतिक्रण होत असे. अनेक राजवाडे उध्वस्थ होऊन गेली होती आणि परकीय शासकांनी येथे सत्ता काबीज केली होती. प्रजेवर जातीनुसार कर लादले जात होते. प्रजेला अवमानाची वागणूक देण्यात येत होती. गोर-गरीब जनता अत्याचारात होरपळत होती. अत्याचारी शक्तींच्या विरोधात ऊभे टाकण्यासाठी कोणी पुढे येत नव्हता तेव्हा गुरु नानकानी बाबर सारख्या बलाढ्य शासकाला आव्हान दिले. त्यांनी सार्वजनिकस्तरावर मोघल शासक बाबर यास जाबर, म्हणजेच अत्याचारी सम्बोधन्याचा धाडस केला. एका संतानी राजसत्ते विरुद्ध ऊभे टाकून बंड करणे हा विलक्षण असा उदाहरण होय.
बाबर याने नानकांना कारागृहात टाकले. नानक डगमगले नाहीत तर त्यांनी बाबर याच्याशी युक्तिवाद केला आणी प्रजेवर सुरु असलेले घोर अत्याचार थांबविण्याचे आवाहन केले. बाबर याने नानक यांचा युक्तिवाद मान्य केला आणी त्यांना व त्यांच्या सोबत असलेल्या कारागृहातील इतर बंदिशस्त लोकांना मुक्त करून टाकले. प्रजेवरील जाचक अटी देखील शिथिल केलेत. गुरु नानकदेव यांचा असा वलय होता. त्यांनी दिलेली मानवतेची शिकवण आणी जीवनतत्व मनवांना श्रेष्ठ जीवनाचा मार्ग प्रशस्त करीत राहील यात शंका नाही. गुरु नानाकदेव यांच्या 555 व्या प्रकाशपर्वा निम्मित सर्वांना शुभेच्छा.
…..स. रविंदरसिंघ मोदी, पत्रकार, नांदेड, 9420654574.