हिमायतनगर| तालुक्यातील मौजे महादापूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्यावरील राहत्या घरास आग लागून रोख रक्कमेसह, कापूस व गृहउपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे महादपूर येथील शेतकरी केरबा गुणाजी बनसोडे हे अल्पभूधारक असून, आपल्या परिवारासह शेतात वास्तव्य करतात. दिनांक १९ डिसेंबर रोजी ते अंत्यविधीच्या निमित्ताने नातेवाईकाकडे गेले असता अचानक त्यांच्या शेतातील आखाड्यावरील घरास आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत त्यांच्या घरातील रोख ५० हजार रुपये, १० क्विंटल कापूस, १२ क्विंटल सोयाबीन, १० क्विंटल गहू तसेच ग्रह उपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडून मोठे नुकसान झाले आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
अचानक लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे शेतकरी कुटुंब उध्वस्त झाले असून, अगोदरच दुष्काळाच्या गर्तेत असलेला शेतकरी आगीच्या संकटामुळे पुन्हा हवालदील झाला आहे. या घटनेतून सावरण्यासाठी शासनाने तात्काळ शेतकरी कुटुंबीयास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)