श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर।विधानसभा निवडणूक काळात राज्य उत्पादन शुल्क किनवट/ माहूर विभागाने अवैध दारू अड्ड्यांवर धाडसत्र राबविणे सुरू केले. असून १५ ऑक्टोबर ते आज पर्यंत च्या कालावधीत एकूण ४९ ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहे,४६ आरोपींना ताब्यात घेत सहा वाहनांसह देशी दारू, हातभट्टी, विदेशी, ताडी, सडवा असा एकूण ७.,७१,००५ / चा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मतदारसंघांत अवैध दारू विक्रीवर एक्साईजची करडी नजर आहे. ही कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड गणेश पाटिल यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक किनवट रत्नमाला गायकवाड. तसेच दुय्यम निरीक्षक रामप्रसाद पवार. बलीराम ईथ्थर. यांच्या नेतृत्वाखाली पार पडली .
सदर कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहम्मद रफी अब्दुल, जवान एम . यू.अनकाडे, अरविंद जाधव, निशिकांत भोकरे, किरण खंदारे तसेच वाहनचालक दिलिप जाधव यांचा समावेश आहे. आचारसंहिता कालावधीमध्ये अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री व नियंत्रण ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे. कुठेही अवैध दारूविक्री होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.