HomeनांदेडHbp. Bhagwatitai Satarkar : संतांच्या विचारांचे आचरण करा, मनातील अज्ञान दूर होते...

Hbp. Bhagwatitai Satarkar : संतांच्या विचारांचे आचरण करा, मनातील अज्ञान दूर होते – ह.भ.प. भगवतीताई सातारकर

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | कारला हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

IMG 20260326 194339 Hbp. Bhagwatitai Satarkar : संतांच्या विचारांचे आचरण करा, मनातील अज्ञान दूर होते – ह.भ.प. भगवतीताई सातारकर
Oplus_16908288

या सोहळ्यात ह.भ.प. भगवतीताई सातारकर यांच्या प्रभावी कीर्तन सेवेने भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनात मार्गदर्शन करताना भगवतीताई सातारकर म्हणाल्या की, संतांचे विचार आत्मसात करून त्यांचे आचरण केल्यास मनातील अज्ञान दूर होते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वासाठी त्याग केला, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपली वृत्ती बदलावी. संतांच्या सहवासात राहिल्यास देवाची अनुभूती निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले. या सप्ताहाची सांगता गुरुवारी ह.भ.प. रमेश महाराज पुर्णेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

IMG 20260326 WA0134 Hbp. Bhagwatitai Satarkar : संतांच्या विचारांचे आचरण करा, मनातील अज्ञान दूर होते – ह.भ.प. भगवतीताई सातारकर

“कारला गावात अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण गाथेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम नवमीनिमित्त प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची गावभर मिरवणूक निघाली. टाळ-मृदंगाच्या गजरात ‘श्रीराम’ नामजपाने संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले, तर घरोघरी पूजा-अर्चा करून भाविकांनी श्रद्धा व्यक्त केली.”

IMG 20260326 WA0133 Hbp. Bhagwatitai Satarkar : संतांच्या विचारांचे आचरण करा, मनातील अज्ञान दूर होते – ह.भ.प. भगवतीताई सातारकर

सप्ताहादरम्यान सात दिवस गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सांगता प्रसंगी शिरापुरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गावासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments