Society should change its negative view of transgender people – Farida Baksh नांदेड| समाजाने तृतीयपंथीयाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन बदलावा कारण तृतीयपंथी व्यक्तीबदलचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक असणे आवश्यक आहे. त्यांच्या बदलचा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता असून समाजाने तृतीयपंथी व्यक्तींना स्वीकारणे व त्यांच्याशी भेदभाव न करता समान वागणूक द्यावी असे मनोगत तृतीयपंथीयांच्या गुरु फरीदा बकश यांनी तृतीयपंथीयांच्या जलसा व बहुचरा माता (मुर्गा देवी) पूजनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.



शहरातील देवकृपा लॉन्स येथे मंगळवारी तृतीयपंथीयांचा जलसा व मुर्गा देवी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तृतीयपंथी समाजात बहुचरा माता (मुर्गा देवी) ला मोठे मानाचे स्थान आहे. या जलसा कार्यक्रमात तृतीयपंथीयांचे गुरु शानुर बाबू बकस, रंजीता गुरु,फरीदा शानुर बकश, अर्चना शानुर बकश, बिजली शानुर बकश, जया शानुर बकश, गौरी यांची प्रमुख उपस्थिती होती.


या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व प्रितम जोंधळे, कमल फाउंडेशनचे अमरदीप गोधणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या जलसा कार्यक्रमात बहुचरा माताची ( मुर्गा देवीं) पूजा मोठ्या हर्षउल्लासात करण्यात आली. यावेळी तृतीय पंथीयांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले.या कार्यक्रमात गणेश पांचाळ, रवि ससाने,कृष्णा तिडके यांच्यासह जिल्ह्यातुन व विविध ठिकाणाहून तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
