नांदेड| गोरक्षणांचे काम अतिशय चोखपणे करून नावलौकिक मिळविलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे. गोरक्षणांचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोलिस निरीक्षक श्री मुंडे यांच्या कार्याचा गौरव आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य उद्धवजी नेरकर यांनी शासनातर्फे पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांना पाठवलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे की, आपल्या राज्यात प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सुधारीत व प्राणी अत्याचार अधिनियम कायदा आणि तत्सम कायदे अस्तित्वात आहेत. आपल्या माध्यमातुन, व कार्यकुशल कतृत्वातुन अनेक गोरक्षकानी गोवंश वाहतुकीच्या किंवा अन्य सुचना दिल्या असता आपण लगेच त्यावर नियमानुसार कारवाई केली, कोणत्याही दडपणाखाली न येता कारवाई करूण आरोपींना तात्काळ अटक केली. तसेच अनेक अबोल जिवांची रक्षा केली.


महाराष्ट्र शासनाने देशी गोवंशाचे धार्मिक, अर्थिक, सामाजिक, व वैज्ञानिक महत्व बघता देशी गायीला राज्यमातेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाच्या माध्यमातुन सुद्धा अनेक उपक्रम राबविले जात आहेत. शासकीय सेवेत असताना सुद्धा आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या गोवंश हत्या बंदी कायद्यांची कडक व योग्य अंमलबजावणी केली. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.असे गौरवुद्गागार आयोगाकडुन काढण्यात येवुन, यापुढेही आपल्याकडुन अशीच कारवाई अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. बकरी ईद दरम्यान पोलिस निरीक्षक देगलुर श्री मारोती श्रीराम मुंडे सर यांची विश्व हिंदु परीषदेच्या वतीने प्रांत गोशाळा संपर्कप्रमुख किरण सुभाषराव बिच्चेवार, मारोती वडजे, बजरंग दल प्रखंड संयोजक, अतुल बिच्चेवार, प्रखंड गोरक्षा प्रमुख, गणेश यशवंतकर, योगेश वाकोडे, शैलेश बोगुलवार व ईतरांनी भेट घेऊन मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.
