Congratulations to Police : महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडुन पोलिस निरीक्षक श्री मुंडे यांचे अभिनंदन
नांदेड| गोरक्षणांचे काम अतिशय चोखपणे करून नावलौकिक मिळविलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे. गोरक्षणांचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोलिस निरीक्षक श्री मुंडे यांच्या कार्याचा गौरव आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य उद्धवजी नेरकर यांनी शासनातर्फे पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांना पाठवलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे की, आपल्या राज्यात प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सुधारीत व प्राणी अत्याचार अधिनियम कायदा आणि तत्सम कायदे अस्तित्वात आहेत. आपल्या माध्यमातुन, व कार्यकुशल कतृत्वातुन अनेक गोरक्षकानी गोवंश वाहतुकीच्या किंवा अन्य सुचना दिल्या असता आपण लगेच त्यावर नियमानुसार कारवाई केली, कोणत्याही दडपणाखाली न येता कारवाई करूण आरोपींना तात्काळ अटक केली. तसेच अनेक अबोल जिवांची रक्षा केली.
महाराष्ट्र...
