उस्माननगर, माणिक भिसे। ऋणानुबंध समाज विकास संस्था संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम सुलोचना माहेर घर , लताई अनाथ आश्रम भोकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांच्यावतीने बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने व ध्येय साध्य करणारे तसेच पत्रकारितेच्या व सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करणाऱ्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहाचे कर्मचारी पत्रकार लक्ष्मण रोहिदास कांबळे पोखरभोसीकर यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र अध्यक्षा सौ लता अविनाश डोंगरदिवे व व्यवस्थापकीय प्रशांत डोंगरदिवे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


उस्मान नगर येथील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहाचे कर्मचारी व पत्रकार हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या सामाजिक कार्याची ओळख ही पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजा समोर आणून तळागाळातील लोकांच्या अपेक्षांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी व शिक्षणासाठी , वस्तीगृहातील गरिब विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवून सदैव तत्पर राहुन कार्य तन,मन लावून सेवा करताना पहावयास मिळतात. आपल्या लेखनीच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न शासना पर्येत पोहचले., व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे.

पत्रकार लक्ष्मण रोहीदास कांबळे पोखरभोसीकर यांच्या कार्याची दखल ऋणानुबंध समाज विकास संस्था संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,माहेर घर ( महिला आश्रय) , लताई बाल अनाथालय आश्रम भोकर ता.चिखली जि.बुलढाणा यांच्या कडून मान कर्तृत्वाचा….. सन्मान नेतृत्वाचा. राज्यस्तरीय बहुजन रत्न सन्मान सोहळा २०२५ बहुजन महापुरुष यांच्या विचारावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. या पुरस्काराचे मानकरी म्हणून उस्माननगर ता.कंधार येथील पत्रकार लक्ष्मण रोहीदास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि. ६ जुलै रोजी श्री. शिवाजी विज्ञान वा कला महाविद्यालय (श्री. शिवाजी सिनियर काॅलेज) चिखली जि.बुलढाणा येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

लक्ष्मण कांबळे यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि संजय निलपत्रेवार , सपोउपनि गजानन गाडेकर , सपोउपनि सुर्यवंशी , धम्मानंद कांबळे ( ज. ने.वि.वसतीग्रह संचालक) , इ. भिमराव कांबळे , अनिल कांबळे जि.प.नांदेड जोंधळे ( केंद्रीय अन्नसुरक्षा सहाय्यक संचालक) , तुकाराम वारकड गुरूजी , सुरेश मामा बास्टे , सौ.शोभाबाई शेषेराव काळम सरपंच , सौ.डि.ए.शिंदे ग्रामपंचायत अधिकारी , गणेश सोनवणे ( मुख्याध्यापक) राहुल सोनसळे ( मुख्याध्यापक) , सौ.वांगे मॅडम , खांन सर, शिवसांब कोरे ( मुख्याध्यापक) , प्रा .विजय भिसे , शिवशंकर काळे ,बि.पी.घोरबांड , अमिनशाह फकिर , केशव कांबळे, फुलाजीट ताटे , दिलीप डांगे , कैलास गिरी महाराज , प्रकाश ताटे ,संजय ताटे , बसवेश्वर वारकड , माधव भिसे,रूद्र वारकड ,डि.के.कांबळे यांच्यासह उस्माननगर, शिराढोण ,मारतळा,बारूळ, कौठा येथील सर्व पत्रकार , राजकीय ,सामाजिक कार्यकर्ते , शिक्षकवृंद, व मित्रपरिवार यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
