मुंबईधार्मिक

Chief Minister Fadnavis : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई| ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज करण्यात आले.

या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, पुस्तकाचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे आणि शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सुंदर आणि आकर्षक कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करताना त्यांना विशेष आनंद होत आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा वारीतून प्रकट होते, जी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या आराधनेत अनुभवता येते. प्रत्येक वारीत अनेक कथा जन्म घेतात आणि त्या या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत.

cm 2 scaled Chief Minister Fadnavis : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

ते पुढे म्हणाले की, तीर्थ आणि त्या तीर्थातील देव या दोन्हींचे महत्त्व या पुस्तकातून अधोरेखित झाले आहे. इतिहास, माहिती आणि समृद्ध छायाचित्रांमुळे हे कॉफीटेबल बुक संग्रहणीय ठरले आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जगासमोर मांडण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

यासोबतच, पंढरपूरची वारी युनेस्को च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Heritage) यादीत समाविष्ट करण्यासाठी सादर करण्यात येणार असून, त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!