Homeक्राईमLCB's crackdown : एलसीबीची धडक कारवाई : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह...

LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद

नांदेड| अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत एक गावठी पिस्टल व १८ जिवंत काडतुसे जप्त केली असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे २५ मार्च रोजी एलसीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी नागेश उर्फ दादा श्रीहरी भारती (वय २२, रा. जिजामाता नगर, नांदेड) याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल (₹२५,०००) व १८ जिवंत काडतुसे (₹३६,०००) असा एकूण ₹६१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व पथकाने केली. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकां मध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments