Wednesday, May 13

Tag: LCB’s crackdown

LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद

LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद

क्राईम, नांदेड
नांदेड| अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत एक गावठी पिस्टल व १८ जिवंत काडतुसे जप्त केली असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे २५ मार्च रोजी एलसीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी नागेश उर्फ दादा श्रीहरी भारती (वय २२, रा. जिजामाता नगर, नांदेड) याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल (₹२५,०००) व १८ जिवंत काडतुसे (₹३६,०००) असा एकूण ₹६१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व पथकाने केली. ...
LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : अवैध वाळू उपशावर मोठा घाव; ४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : अवैध वाळू उपशावर मोठा घाव; ४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ४९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक २३ मार्च रोजी एलसीबीच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान १ ब्रास अवैध वाळू (₹५०,०००) तसेच हायवा (₹४९ लाख) असा एकूण ₹४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाजेगाव,नांदेड आणि रा. बोंडार, उमरी येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वा...
error: Content is protected !!