नांदेड। सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड व संचालक मंडळाची आज निवडणूक होऊन बहुमतांने दत्ता (बंडू) माधवराव पाटील भोसले हे चेअरमन पदी निवडूण आले.


तत्कालीन चेअरमन अशोक पाटील मारतळेकर यांनी राजीनामे दिल्यामुळे आज अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.या पतसंस्थेत शिक्षक नेते तथा शिक्षक एकता पॅनलचे प्रमुख देविदासराव बस्वदे यांच्या नेतृत्वात एकता पॅनलची एकहाती सत्ता गेल्या सार्वत्रिक निवडणूकीपासून आहे. अल्पमतात असतांनाही बंडू पाटील भोसले यांच्या विरोधात फुटीर संचालक प्रल्हाद राठोड यांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी दाखल करून केवळ तीन मते घेत स्वतःचे हसे करून घेतले तर बंडू भोसले यांनी ११ मते घेवून राठोडयांना आस्मान दाखवले.

आज गोकूळनगर येथील पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रीयेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील प्राधिकृत अधिकारी सूर्यकांत मंगनाळे,संजय कार्लेकर, संजय झळके आदिनी काम पाहिले.

यावेळी एकता पॅनल प्रमुख देवदासराव बस्वदे,राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते जीवनराव वडजे,बाबूराव फसमले,नेते चंद्रकांत दामेकर, अशोक पवळे, फारूक बेग, जयवंतराव काळे, अखिलचे माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, जिल्हाध्यक्ष संतोष कदम, दत्तात्रय धात्रक,दीपक लोहबंदे,प्रमोद पाटील, उद्धव सूर्यवंशी,तसलीम शेख, जे.डी.कदम,प्रकाश मुंगल, विलास पवार,पाराजी पोले, रावसाहेब पऊळ, चंद्रकांत शिंदे,लक्ष्मण सूर्यवंशी,डी.डी. गायकवाड,बळवंत टेकाळे, प्रवीण नरवाडे, भगवान गजभारे, सुहास मुळे यांचेसह पतसंस्थेचे संचालक तथा मावळते चेअरमन अशोक पाटील मारतळेकर, सचिव बाबूराव कैलासे, उपाध्यक्षा सौ.राजेश्री देशमुख, संचालिका संगीता फसमले, दिलीप देवकांबळे, माणिकराव कदम,संजय अंबूरे,सुधाकर थडके, हनमंत जोगपेठे, बालासाहेब लोणे यांचेसह असंख्य सभासद उपस्थित होते.

बंडू भोसले हे चेअरमन पदी निवडून आल्याची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.एकता पॅनलच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन दत्ता (बंडू) पाटील भोसले यांचा जंगी सत्कार करण्यात आला.