Datta Patil Elected ; सहकारी पतपेढीच्या चेअरमन पदी दत्ता (बंडू) पाटील भोसले यांची निवड
नांदेड। सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड व संचालक मंडळाची आज निवडणूक होऊन बहुमतांने दत्ता (बंडू) माधवराव पाटील भोसले हे चेअरमन पदी निवडूण आले.
तत्कालीन चेअरमन अशोक पाटील मारतळेकर यांनी राजीनामे दिल्यामुळे आज अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.या पतसंस्थेत शिक्षक नेते तथा शिक्षक एकता पॅनलचे प्रमुख देविदासराव बस्वदे यांच्या नेतृत्वात एकता पॅनलची एकहाती सत्ता गेल्या सार्वत्रिक निवडणूकीपासून आहे. अल्पमतात असतांनाही बंडू पाटील भोसले यांच्या विरोधात फुटीर संचालक प्रल्हाद राठोड यांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी दाखल करून केवळ तीन मते घेत स्वतःचे हसे करून घेतले तर बंडू भोसले यांनी ११ मते घेवून राठोडयांना आस्मान दाखवले.
आज गोकूळनगर येथील पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रीयेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील प्राधिकृत अधिक...
