HomeनांदेडChhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन...

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न

नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व पुरातत्त्व संशोधक केतन पुरी यांच्या व्याख्यानाने करण्यात आली. त्यांनी शिवचरित्राचा ऐतिहासिक संदर्भ देत महाराजांची दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य, संघटनशक्ती आणि राष्ट्रनिर्मितीतील मोलाचे योगदान यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.

ccc 4 Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न

यानंतर शाहिर प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. डॉ. मुरलीधर हंबर्डे व त्यांच्या संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यात शिवचरित्रातील पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि जाज्वल्य राष्ट्राभिमानाचे सादरीकरण करण्यात आले.

ccc 1 Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न

या कार्यक्रमास नांदेडच्या महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार-कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

ccc 2 Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श, स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावी दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments