HomeनांदेडDistrict Collector Rahul Kardile : पेट्रोल-डिझेलचा अतिरिक्त साठा टाळा – जिल्हाधिकारी राहुल...

District Collector Rahul Kardile : पेट्रोल-डिझेलचा अतिरिक्त साठा टाळा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड| जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेलची पॅनिक खरेदी करू नये तसेच अनावश्यक साठा करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपधारकांची बैठक पार पडली.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड तसेच विविध पेट्रोलपंप मालक उपस्थित होते. बैठकीत पेट्रोलपंपधारकांनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण करण्यात आले.

जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला पेट्रोल व डिझेलचा साठा पर्याप्त प्रमाणात राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत साठाबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही, यासाठी कडक सूचना देण्यात आल्या.

पेट्रोलपंपधारकांच्या सूचनेनुसार रविवारी तेल डेपो सुरू ठेवणे तसेच मागणीनुसार इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत तेल कंपन्यांना निर्देश देण्यात आले. पेट्रोलपंपांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा घेतल्यानंतर दैनंदिन गरजेनुसार पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments