Wednesday, May 13

Tag: of petrol and diesel

District Collector Rahul Kardile : पेट्रोल-डिझेलचा अतिरिक्त साठा टाळा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : पेट्रोल-डिझेलचा अतिरिक्त साठा टाळा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेलची पॅनिक खरेदी करू नये तसेच अनावश्यक साठा करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपधारकांची बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड तसेच विविध पेट्रोलपंप मालक उपस्थित होते. बैठकीत पेट्रोलपंपधारकांनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला पेट्रोल व डिझेलचा साठा पर्याप्त प्रमाणात राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत साठाबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही, यासाठी कडक सूचना देण्यात आल्या. पेट्रोलपंपधारकांच्या सूचनेनुसार रविवारी तेल डेपो सुरू ठेवणे तसेच मागणीनुसार इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत तेल कंपन्यांना निर्देश देण्या...
error: Content is protected !!