नांदेड l स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेराणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी 2017 पासून वार्षीक स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवाडा साजरा केला जातो. केंद्रे शासनाच्या सूचनानुसार यावर्षी दि.17 सप्टेंबर, 2025 ते दि.02 ऑक्टोबर, 2025 या दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून या वर्षी “स्वच्छोत्सव-स्वच्छता ही सेवा-2025” नामे हे अभियान राबविण्यात येत आहे.


त्याअनुषंगाने आज दि.24 सप्टेंबर 25 रोजी सकाळी 08.ते 09.वा वर्कशॉप कॉर्नर ते अशोक नगर पर्यंत डॉ.महेशकुमार डोईफोडे मा आयुक्त, गिरीश कदम अतिरीक्त आयुक्त, नितीन दशरथ गाढवे उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा (SHS) -2025 या अभियान अंतर्गत सखोल स्वच्छता मोहीम व सामूहिक स्वच्छता शपथ घेण्यात आली सदरील अभियानात अभियानाचे समन्वय अधिकारी, राजेश जाधव, क्षेत्रिय अधिकारी मनपा नांदेड यांच्यासह गुलाम मोहम्मद सादेख सहाय्यक आयुक्त स्च्छता व अभियानाच्या यशस्वी साठी वसीम हुसेन तडवी, मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि प्रभाग क्रं.1 ते 10 चे स्वच्छता निरीक्षक, शहरतील प्रतिष्ठीत नागरिक आणि महानगर पालिकेतील अधिकारी/ कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी सहभागी होते.




