HomeनांदेडForest Department : वन अधिकाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार उकळल्याचा आरोप

Forest Department : वन अधिकाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार उकळल्याचा आरोप

नांदेड| माहूर तालुक्यात ट्रॅक्टर चालकाला बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार रुपये उकळल्याचा गंभीर आरोप किनवट येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम यांनी उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, ही घटना ११ मार्च रोजी घडली. ट्रॅक्टर मालक प्रसराम बापूराव पारडे यांचा चालक दीपक अंबादास करपते (रा. साकूर, ता. माहूर) हा कुपटी ते पाचोंदा राज्य मार्ग क्रमांक ५१ वरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना किनवटचे वन परीक्षेत्र अधिकारी राठोड आणि चिखली (ता. किनवट) राउंडचे वनपाल कोम्पलवार यांनी त्याला अडवले.

तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाला बेकायदेशीररित्या अडवून विना परवाना अग्निशस्त्राचा धाक दाखवत ५० हजार रुपये आणून देण्याची मागणी केली. तसेच ‘नाहीतर गोळी घालू’ अशी धमकी देत रेती वाहतूक केल्याचा बनावट व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या दबावामुळे ट्रॅक्टर जप्त होऊ नये म्हणून मालकाने उसनवारी करून दिगंबर नागेंद्र भारती यांच्या मार्फत ५० हजार रुपये संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम वनपाल कोम्पलवार यांनी स्वीकारल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेची तक्रार उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्याकडे करण्यात आली असून त्याच्या प्रती मुख्य वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

IMG 20260318 WA0017 Forest Department : वन अधिकाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार उकळल्याचा आरोप

दरम्यान, कार्यक्षेत्राबाहेर जाऊन अशा प्रकारे लूटमार केल्याचा आरोप असलेल्या संबंधित वन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉ. शंकर सिडाम यांनी दिला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments