HomeनांदेडShri Ram Pahat : रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रमाचे आयोजन

Shri Ram Pahat : रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी) श्रीराम नवमीचे औचित्य साधत २६ मार्च रोजी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर रामगीते रसिक श्रोत्यांसाठी श्रवणीय पर्वणी ठरणार आहेत. या विलोभनीय उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष असून कलागंण प्रतिष्ठान, श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अविस्मरणीय सोहळा साकार होत आहे.

येथील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २६ रोजी गुरुवारी पहाटे साडे पाच वाजता आयोजित श्रीराम पहाट या भक्तिमय संगीतपर्वांचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते होणार असून मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ.नितीन जोशी, डॉ.सुशील राठी, वेदशास्त्र संपन्न मनोजगुरू पेठवडजकर, उद्योजक रमेश पारसेवार, भगिरथ राठी यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती असणार आहे.

श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर सादर होणार्‍या या संगीत सोहळ्यात प्रशांत काळुन्द्रेकर (मुंबई), प्रज्ञा देशपांडे (पुणे), संज्योती जगदाळे (मुंबई) आदी सुप्रसिद्ध गायक आपल्या सुमधुर स्वरात रामगीते सादर करणार आहेत. त्यांना मंदार गोडसे, विवेक परांजपे, यश सोमण, पंढरीनाथ दरेकर, पंकज शिरभाते, भगवान देशमुख विविध वाद्यावर साथसंगत करणार आहेत.

एकापेक्षा एक सरस रामगीतांची अविट गोडी जपतांना त्याच्या जोडीला अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांचे दर्जेदार निरूपणही यावेळी होणार असून या उपक्रमाची निर्मिती व संकल्पना देखील त्यांचीच आहे. या अप्रतिम निर्मितीला ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांचे उल्लेखनीय सहाय्य लाभले आहे.

रामसेवा गौरव पुरस्कार
प्रभू श्रीराम यांचा १७ कोटी नामजप पूर्ण करणारे अ‍ॅड.व्यंकटेश पाटणूरकर व पवित्र अमरनाथ धाम येथील आतापर्यंत २७ यात्रा सफल करणारे अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांना श्रीराम पहाट सोहळ्याच्या भव्य मंचावर रामसेवा गौरव पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्याला श्री.स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी, नांदेड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

श्रीराम नवमीच्या निमित्ताने व गोविंदगिरी देव महाराज व किशोरजी व्यास यांच्या कृपाशीर्वादाने सलग चौथ्या वर्षी आयोजित श्रीराम पहाट या अविस्मरणीय सोहळ्यात नांदेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रामगीतांचा भक्तिमय गजर करावा, असे आवाहन शिवप्रसाद राठी, रमेश मेगदे, गोवर्धन बियाणी, शंतनू डोईफोडे, डॉ.सुरेश दागडिया, महेश चांडक, निलेश चांडक, अ‍ॅड.चिरंजीलाल दागडिया, रमेश सारडा, नंदकुमार दुधेवार, राम शेट्टीतुप्तेवार, रमाकांत गंदेवार, बापू दासरी, माधवराव पटणे, अनिल शेटकार, रमेश मिरजकर, प्रणव मनुरवार, लक्ष्मीकांत बंडेवार, प्रा.प्रभाकर उदगीरे, श्याम राठी, विजय बंडेवार, जगजीवन सिंग रिसालदार, बालासाब मादसवाड, विजय डुमणे, पुरुषोत्तम देशपांडे, राजू कोटलवार, संतोष पाळेकर, कृष्णा केशटवार, नारायण आकमार, प्रसाद जोशी, रमेश सुरकुटवार यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments