Wednesday, May 13

Tag: Shri Ram Pahat program organized

Shri Ram Pahat : रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रमाचे आयोजन

Shri Ram Pahat : रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रमाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) श्रीराम नवमीचे औचित्य साधत २६ मार्च रोजी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर रामगीते रसिक श्रोत्यांसाठी श्रवणीय पर्वणी ठरणार आहेत. या विलोभनीय उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष असून कलागंण प्रतिष्ठान, श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अविस्मरणीय सोहळा साकार होत आहे. येथील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २६ रोजी गुरुवारी पहाटे साडे पाच वाजता आयोजित श्रीराम पहाट या भक्तिमय संगीतपर्वांचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते होणार असून मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ.नितीन जोशी, डॉ.सुशील राठी, वेदशास्त्र संपन्न मनोजगुरू पेठवडजकर, उद्योजक रमेश पारसेवार, भगिरथ राठी यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती असणार आहे. ...
error: Content is protected !!