HomeनांदेडNanded Book Festival : नांदेड ग्रंथोत्सव-2025 : वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा लाखांची...

Nanded Book Festival : नांदेड ग्रंथोत्सव-2025 : वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा लाखांची ग्रंथविक्री

नांदेड| नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 14 व 15 मार्च रोजी उत्साहात पार पडला. या ग्रंथोत्सवात वाचकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विक्रमी ग्रंथखरेदी केली असून, दोन दिवसांत सुमारे दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रंथप्रेमींना साहित्यिक मेजवानीसोबतच विविध प्रकाशनांच्या पुस्तकांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचक व ग्रंथालय चालकांना आवश्यक असलेली पुस्तके सहज मिळावीत या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रकाशन, शांती पब्लिकेशन (पुणे), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचा ग्रंथप्रदर्शन स्टॉल, संकेत प्रकाशन, निर्मल प्रकाशन (नांदेड), संदेश बुक डेपो (परभणी), प्रगती बुक डेपो (हिंगोली), मांडणीकर बुक डेपो (नांदेड), मराठवाडा बुक सेलर्स (नांदेड), ओमकार प्रकाशन (नांदेड व हिंगोली) आदींसह अनेक प्रकाशकांनी सहभाग घेतला होता.

granth 2 Nanded Book Festival : नांदेड ग्रंथोत्सव-2025 : वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा लाखांची ग्रंथविक्री

या ग्रंथप्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, डॉ. मा. मा. जाधव, प्रा. संजय जगताप, साहित्यिक डॉ. विलास वैद्य, साहित्यिक नारायण शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

granth 1 Nanded Book Festival : नांदेड ग्रंथोत्सव-2025 : वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा लाखांची ग्रंथविक्री

प्रकाशकांनी दर्जेदार व विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे वाचकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथखरेदी करत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिणामी, अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर ग्रंथविक्री होत हा ग्रंथोत्सव यशस्वी ठरला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments