Nanded Book Festival : नांदेड ग्रंथोत्सव-2025 : वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा लाखांची ग्रंथविक्री
नांदेड| नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 14 व 15 मार्च रोजी उत्साहात पार पडला. या ग्रंथोत्सवात वाचकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विक्रमी ग्रंथखरेदी केली असून, दोन दिवसांत सुमारे दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रंथप्रेमींना साहित्यिक मेजवानीसोबतच विविध प्रकाशनांच्या पुस्तकांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचक व ग्रंथालय चालकांना आवश्यक असलेली पुस्तके सहज मिळावीत या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रकाशन, शांती पब्लिकेशन (पुणे), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचा ग्रंथप्रदर्शन स्टॉल, संकेत प्रकाशन, निर्मल प्रकाशन (नांदेड), संदेश बुक डेपो (परभणी), प्रगती बुक डेपो (हिंगोली), मांडणीकर बुक डेपो (नांदेड), मराठवाडा बुक सेलर्स (नांदेड), ओमकार प्रकाशन (नांदेड व हिंगोली) आदींसह अनेक प्रकाशकांनी सहभाग घेतला होता.
या ग्रंथप्रदर्शन व विक्र...
