श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर ग्रामीण बँकेचे खातेदार परवेज फंटूस देशमुख रा. रुई ता. माहूर यांचा दिनांक २८/ ८/२०२४ रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांचे वारस वडील फंटूस शेरासाहेब देशमुख यांनी बँकेत दिनांक ४ डिसेंबर रोजी क्लेम दाखल केला. बँकेचे व्यवस्थापक दिपंकर पाटील यांनी वरिष्ठ स्तरावर योग्य ते पाठपुरावा योग्य त्या वेळेत केल्यामुळे वारसांना केवळ २१ दिवसात बँकेकडून दोन लाख रुपयाचा विमा योजनेचा लाभ मिळवून दिला.
बँकेचे व्यवस्थापक दीपंकर पाटील यांचे या कमी कालावधीत मयताच्या वारसास लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माहूरचे बीसी सूर्यकांत जाधव यांनी त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रातून परवेज फंटूश देशमुख यांचे खाते उघडले होते. त्याच सोबत बँकेच्या विमा योजनेचे फार्म दाखल केले होते. वार्षिक वीस रुपये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मयत परवेज देशमुख यांना झाला आहे.
बँकेकडून दोन लाख रुपयाचा विमा वारसास बँकेचे व्यवस्थापक दिपंकर पाटील, सहाय्यक व्यवस्थापक विपिन सर, कुमरे सर, कॅशियर मनीष सर, किरण मॅडम बँकेचे कर्मचारी श्री सूर्य, भोजराज राठोड, बँकेचे बीसी सूर्यकांत जाधव यांची उपस्थितीत दोन लाखाचा विमा वारस फंटूश देशमुख यांना प्रदान करण्यात आला आहे.
बँकेचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वार्षिक वीस रुपये, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना वार्षिक ४३६ रुपये,अटल पेन्शन योजना व यासह इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेशी किंवा बँक मित्र/ बिसी ग्राहक सेवा केंद्राची संपर्क साधण्याचे आव्हान यावेळी व्यवस्थापक दिपंकर पाटील यांनी केले आहे.