नांदेड| सिख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज यांना नमन करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे त्यांचे महान कार्य आहे असे प्रतिपादन नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी की केले.
येथील प्रियदर्शनी शैक्षनिक संकुलात श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. जयंतनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,सरदार महेंद्रसिंघ पैदल,धनंजय उमरीकर,श्रेयस कुमार बोकारे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रियदर्शनी शैक्षनिक संकुल चे अध्यक्ष बालासाब मादसवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रियदर्शनी शैक्षनिक संकुलातील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रारंभी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्री गुरु गोविंदसिंग जी हे अन्याय, अधर्म, अत्याचार आणि दडपशाहीविरोधात तलवार उचलून लढा देणारे इतिहासातील महान व्यक्तिमत्त्व होते. गुरुजींच्या तीन पिढ्यांनी देशाच्या,धर्माच्या रक्षणासाठी मोठे बलिदान दिले. त्यांना नमन करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे महान कार्य गुरुजींचे आहे असे नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले. गुरु गोविंदसिंग हे शिखांचे दहावे गुरू होते. ते महान तत्त्वज्ञ, प्रख्यात कवी, निर्भीड आणि निर्भीड योद्धा, युद्धकौशल्य, महान लेखक आणि संगीताचे पारखी होते अशी माहिती सरदार महेंद्रसिंघ पैदल यांनी यावेळी दिली. शेवटी बालासाब मादसवाड यांनी आभाप्रदर्शन केले.