Homeमालेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार  एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर-NNL

मालेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार  एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर-NNL

अर्धापूर, नीळकंठ मदने। तालुक्यातील मालेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील २२ गावांसाठी मागील एक महिन्यापासून एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने रुग्णांची  हेळसांड होत असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी तालुका  सरचिटणीस संजय पाटील इंगोले यांनी केली आहे.

मालेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे यांचा मागील  एका महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. तेंव्हापासून या आरोग्य केंद्रातील एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जवळपास परिसरातील २२ गावांतील रुग्णांचा भार पडला आहे.या भागातील रुग्ण
आरोग्य केंद्रात प्रसूती साठी आणि उपचारासाठी  मोठ्या प्रमाणात येत असतात.

अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठया प्राथमिक आरोग्य  केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आजघडीला उपलब्ध असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असून रुग्णांची हेळसांड होत असून आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मालेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी  परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. आरोग्य केंद्राचा कारभार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.तात्काळ दुसरा वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments