MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

bhimrao keram MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड| केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा सन्मान आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते एन. के. गार्डन किनवट येथे करण्यात आला. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत समावेशित 500 तालुक्यात जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले होते. यात किनवट तालुक्याने 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त केले आहेत. किनवट तालुक्याने राज्यातील 27 तालुक्यातुन तिसरे स्थान प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुकास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तत्कालीन गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांना पदक व प्रशस्तीपत्र तर संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व गावपातळीवरील कर्मचारी यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम, प्रमुख उपस्थिती तहसीलदार शारदा चोंडेकर, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, सहा.गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, तालुका कृषि अधिकारी श्री निमोड, तालुका आरोग्य अधिकारी के.पिं.गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, स्वीय सहाय्यक संतोष मरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद दराडे, प्र.बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी जामोदे यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी केले. यात त्यांनी आकांक्षित तालुका कार्यक्रमाची पूर्ण माहिती दिली. मार्गदर्शन करताना आमदार भीमराव केराम यांनी आकांक्षित तालुका कार्यक्रमातील यश हे आपणा सर्व किनवट वासियांचा गौरव असून तो गौरव अजून वाढविण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने पुढे काम करायचे आहे असे सांगून सन्मानास पात्र अधिकारी कर्मचारी यांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.

आकांक्षा हाटचे उद्घाटन – व्होकल फॉर लोकल उपक्रमाअंतर्गत स्थानिक उत्पादनाचे प्रदर्शन आणि प्रचार करण्यासाठी याच कार्यक्रमात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते आकांक्षा हाटचे उदघाटन करण्यात आले आहे. यात उमेद अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता समूह, किनवटस्थीत अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प टिम, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांनी सदर प्रदर्शनात सहभाग नोंदविला. यात स्थानिक स्वादिष्ट पदार्थ, हस्तनिर्मित कपडे, रानभाज्या, वस्तू, जैविक औषधे आणि इतर स्थानिक उत्पादीत वस्तुसह विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. सरकारी योजनाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकंदरीत देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आकांक्षा हाट हे विधायक बदलाचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

या अभियानात समावेशित निर्देशक (जुलै ते सप्टेंबर 2024)
गर्भवती महिलांची पहिल्या तिमाहीतील नोंदणी. 30 वर्षावरील सर्व नागरिकांची मधुमेह संदर्भात तपासणी. 30 वर्षावरील सर्व नागरिकांची उच्च रक्तदाब संदर्भात तपासणी. गर्भवती महिलांना पूरक पोषण आहाराचे वितरण. मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करणे. नोंदणीकृत सर्व एसएचजी ना फिरत्या निधीचे वितरण.

अभियान कालावधीत संपृक्त निर्देशक
30 वर्षावरील सर्व नागरिकांची मधुमेह संदर्भात तपासणी. 30 वर्षावरील सर्व नागरिकांची उच्च रक्तदाब संदर्भात तपासणी. गर्भवती महिलांना पूरक पोषण आहाराचे वितरण. मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करणे.

कौतुकास्पद कामगिरी केलेले अधिकारी-कर्मचारी
सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी (निवृत्त प्रकाश पल्लेवाड, तंत्र अधिकारी बालाजी बाबुराव मुंडे, सोबत 24 कृषी सहाय्यक. डॉ.के.पि.गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, किनवट सोबत – सीएचओ-8, एएनएम-9, बीसीएम बीसीएम-1, आशा-9. श्रीमती अश्विनी सायलू ठकरोड, अधिक्षीका, शासकीय माता अनुसया महिला वसतिगृह नांदेड (तत्कालीन बाल विकास प्रकल्प अधिकारी) सोबत 15 अंगणवाडी सेविका. निवृत्ती मुकनर, विस्तार अधिकारी (पं.)/आकांक्षित तालुका कार्यक्रम पांडुरंग मामीडवार, आकांक्षी तालुका फेलो-किनवट गंगाधर मारोती घ्यार, टीम लीडर, पाणलोट प्रकल्प.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधिक्षक अमोल टोम्पे, कृषि अधिकारी सिकंदर पठाण, सहाय्यक लेखा अधिकारी सुनिल नेम्मानिवार, वरिष्ठ सहाय्यक राजेश म्याकलवार, पवन कोटपेल्लीवार, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, जीवन कांबळे, श्रीमती एस. एल. चव्हाण, आकांक्षित तालुका समन्वयक पांडुरंग मामीडवार, कनिष्ठ सहाय्यक अंकुश राठोड, श्रीमती प्रभा लटपटे, इतर कार्यालयीन कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, नरेगा कर्मचारी, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषि सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम, आशा, अंगणवाडी सेविका, आयसिआरपी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top