raid to check electricity meters : लोहा शहरात विद्युत मीटर’ तपासणीसाठी १० अधिकारी ४० कर्मचाऱ्यांची धडक मोहीम ; बाराशे ग्राहक रडारवर

लोहा l लोहा शहरात शुक्रवारची सकाळी विद्युत मीटर जोडणीत”खाडाखोड करणाऱ्यासाठी ‘धडकी भरविणारी होती विद्युत मंडळाचे, ४० कर्मचारी व १० अधिकारी यांचे नऊ पथक घरगुती विज मीटर तपासणीसाठी घरोघरी गेले. त्यांनी १४० मीटर बदल तपासणी केली त्यातील ४५ विद्युत मीटर मध्ये रिडींग’ ची खाडाखोड असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात असून ते तपासणी साठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे ‘मीटर मध्ये गडबड करणाऱ्या ग्राहकांचे ‘ धाबे दणाणले आहेत.

विद्युत कंपनीचे मुख्य अभियंता राजाराम माने, अधिक्षक अभियंता श्री जाधव यांनी बैठकी दिलेल्या निर्देशानुसार लोहा शहरात विद्युत मीटर तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.

बाराशे घरगुती विद्युत जोडणी या तपासणी पथकाच्या रडारवर आहेत विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी चव्हाण यांच्या मार्गदर्शाना खाली. लोहा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री सुतार व शहर अभियंता व्ही. डी. स्वामी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. २५ एप्रिल) लोहा शहरात विद्युत कंपनीचे नऊ टीम पथक’ मीटर तपासणी मोहिमेसाठी शहरातील वेगवेगळ्या भागात धडकले.

उपकार्यकारी अभियंता सुतार विद्युत शहर व्ही डी स्वामी, इंजि. अर्जुन वडजे इंजि , संग्राम जाधव, योगेश लालमे सुदर्शन गव्हाणे, पी. आर. थोरात, विलास कानोले, सचिनन गच्चे पी. पी. साखरे यांच्या नऊ टीम व सोबत ४० कर्मचारी असा लवाजमा शहरातील वेगवेगळ्या भागात दाखल झाला . १४५ विद्युत मीटर तपासले तकेली तेथे तात्काळ नवीन मीटर बसविण्यात आले यात ४५ विद्युत मीटर मध्ये खाडाखोडीच्या शंका आल्याने ते नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

त्यात’ गडबड’ आढल्यास’ दंडासह’ बिल वसुली केले जाणार .त्यात ग्राहक जर दुसऱ्यांदा पुन्हा दोषी आढळला तर मात्र त्यावर पोलीस कार्यवाही केली जाते. लाईट ऑफीसच्या तपासणी मुळे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांची तारांबळ उडाली असून हे पथक शहरात सगळीकडे तपासणी करणार आहे असे विद्युत विभागाचे शहर अभियंता श्री स्वामी यांनी सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button