Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लेख - Wari Bhakti : श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची नास्तिकतावादाची नाही !
लेख मुंबई July 4, 2025

Wari Bhakti : श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची नास्तिकतावादाची नाही !

NNL TeamBy NNL TeamJuly 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

प्रस्तावना – २ जुलैला महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या सचिव व प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झाल्याची वस्तूस्थिती सदनासमोर मांडली आणि याची चौकशी करण्याची मागणी केली. डॉ. कायंदे यांनी ढोंगी पुरोगाम्यांचा बुरखाफाड केल्याने आता संविधानाच्या आडून स्वतःचा बचाव करण्याचा पवित्रा या लोकांनी घेतला आहे. डॉ. कायंदे यांनी जो आक्षेप घेतला आहे, तो संविधानाचे नाव पुढे करून या लोकांकडून केल्या जाणाऱ्या हिंदुद्रोहाविषयी आहे. 

भारतीय संविधान सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, परंतु याचा अर्थ असा नाही की, वारीचा वापर नास्तिकतेच्या प्रसारासाठी करण्यात येईल.  जर संविधान दिंडी खरंच सर्वसमावेशकता मांडते, तर ती फक्त वारीमध्येच का ? मातम, मोहरमला किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या संध्येला का नसावी? हा दुजाभाव का ? ही चळवळ वारीसारख्या धार्मिक यात्रांचा आधार घेऊन साम्यवादी विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न करत आहे, हे निषेधार्ह आहे.

देव धर्म न मानणाऱ्यांचे वारीमध्ये काय काम ?
संपूर्ण महाराष्ट्रात लाखो वारकरी पांडुरंगाच्या चरणी एकवटतात, त्या वारीमध्ये अचानक ‘पर्यावरण’, ‘संविधान’, ‘समता’, अशा आडवळणी उद्दिष्टांसाठी दिंडी सजवून सहभागी होणं हे केवळ विरोधाभासीच नव्हे, तर वारीच्या मूळ भावनांना गालबोट लावणारे ठरते. श्रद्धेच्या नावाखाली वारकरी विरोधी विचार प्रणाली रुजवण्याचा प्रयत्न, हा वारकरी संप्रदायाच्या  पारंपरिक स्वरूपाला बाधक ठरतो. जो आक्षेप घेतला जात आहे, तो संविधानाच्या आडून चालवल्या जात असलेल्या कारवायांविषयी आहे. वर्ष २०२२ मध्ये नक्षलवादाचा आरोप असलेले शीतल साठे आणि सचिन माळी हे संविधान दिंडीमध्ये सहभागी झाले होते. त्या जोडीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तथाकथित पुरोगामी या दिंडीत सहभागी झाले होते.

प्रश्न असा आहे की, जे देव-देश-धर्म मानत नाही, त्यांचे भक्तीचा मेळा असलेल्या वारीत काय काम ? बरं, या प्रवृत्ती केवळ हिंदु धर्म मानत नाही, भारतमातेला मानत नाही, एवढे पण एक वेळ ठीक होते; पण हे हिंदु धर्म आणि भारत यांना संपवण्याचा विडा घेऊन काम करत आहेत. आक्षेप इथे आहे. ज्यांना देवाधर्माला (केवळ हिंदूंच्या) शिव्याच द्यायच्या आहेत, ज्यांची मनोवृत्ती, कृती आणि भविष्यातील योजनाही जगातून जवळपास संपुष्टात आलेला साम्यवाद भारतात रुजवण्याची आहे, त्यांचे वारीमध्ये काय काम ? 

समाजविघातक तत्त्वांवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता !
 बरं, याच लोकांनी पुण्यामध्ये शनिवारवाड्यावर सभा घेऊन संविधानाच्या नावाखाली ‘एल्गार’ केला होता. त्याचे धागेदोरे पुढे पंतप्रधानांच्या हत्येचा कट करण्याच्या प्रकरणात सापडले होते. जर ही मंडळी वारीमध्ये शिरत असतील, तर त्यांचा वारीत घातपात घडवण्याचा उद्देश नसेल कशावरून ? त्यामुळे केवळ सांस्कृतिकदृष्ट्या नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि समाजविघातक तत्त्वांवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे. 

वारीमध्ये नक्षलवादी शिरू नये म्हणून मागणी केलेली असताना वारीला बदनाम केले जात आहे असे सांगून एक प्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वारीतील नक्षलवादाची व गंभीर आरोप असणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याचा व वारकऱ्यांची वारी पवित्र ठेवण्याला विरोधच करत आहेत. हा खूपच गंभीर प्रकार आहे. खरे तर वारीच्या रक्षणासाठी भूमिका घेण्याऐवजी वारीच्या मुळावर घाव घालणारी भूमिका काँग्रेस घेत आहे.

बेगडी संविधानप्रेम – या तथाकथित पुरोगाम्यांना जर खरेच संविधानप्रेम असेल, तर त्यांनी एक कृती करावी ! सध्या ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे आणीबाणीच्या काळात प्रास्ताविकेत घुसडलेले शब्द हटवण्याची मागणी होत आहे. इंदिरा गांधी यांनी हे शब्द घुसडून संविधानाची हत्या केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान त्यांना मान्य नव्हते, असाच त्यातून अर्थ निघतो. जर समता दिंडी वाल्यांनी जर खरेच संविधानाविषयी कळकळ असेल, तर त्यांनी जाहीर मागणी करावी की, असंवैधानिक पद्धतीने संविधानात घुसडलेले ‘समाजवाद’ आणि ‘धर्मिनरपेक्षता’ हे शब्द हटवावेत. त्यांनी तसे केले नाही, तर त्यांचे संविधानप्रेम बेगडी आहे हे स्पष्ट होईल. 

वारीवर राजकीय, वैचारिक, किंवा प्रचारकी ग्रहण लागू देता कामा नये !
आव्हाड म्हणतात की, वारकरी हा संविधानप्रेमी आहे. आमच्या संतांनीच आम्हाला समता, बंधुता शिकवली आहे. त्यामुळे संविधानाला जे अपेक्षित आहे, ते आमच्या संतांनी आधीच सांगितले आहे. वारकरी संविधान प्रेमी असू शकतो; पण संविधान प्रेमाचा आव आणून जे वारीत घुसले आहेत, ते वारकरी नाहीत, त्याचे काय ? याच आव्हाडांनी आतंकवादी इशरत जहा पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी लाखो रूपये देऊ केले होते. तिच्या नावाने रुग्णवाहिका चालू केली होती. जी व्यक्ती देशाच्या मूळावर उठलेल्या आतंकवाद्याप्रती सहानुभूती बाळगते, तिच्या तोंडी संविधानाची पूजा वगैरे शब्द शोभत नाहीत. वारी ही श्रद्धेची, शांतीची आणि संस्कृतीची चळवळ आहे. तिच्या आध्यात्मिक महत्त्वावर कुणाचेही 

विशेषतः देव – धर्म न मानणाऱ्यांचे प्रचारकी ग्रहण लागू देता कामा नये. संतांनीही ‘धर्माचे पालन करणे पाखंड खंडण’ आणि ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ अशी शिकवण दिली आहे. त्यामुळे या अर्बन नक्षल्यांना वारीतून हाकलणे, हेच संतांनाही अभिप्रेत आहे. समाज विघातक तत्वांना बाजूला करून वारीचे पावित्र्य जपणे ही ही एक प्रकारे देवपूजाच आहे. त्यामुळे वारीचे पावित्र्य टिकण्यासाठी वारीत शिरलेल्या अराजकवादी तत्त्वांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

 – श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 70203 83264)

An attempt to instill a deviant ideology in the name of faith! It is about devotion not atheism!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCrop loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. श्रीजया चव्हाण
Next Article Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Animal and Bird Exhibition : परळी वैजनाथमध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

Sunetra Pawarani takes oath as Deputy Chief Minister : दुःखातून धैर्याचा उगम; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्यकारणात रचला नवा इतिहास

Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cm Devendra Fadanvis ; ‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 30, 2025

Akhand Dattanam : माहूरगड येथील विष्णुकवि मठात अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन

February 19, 2025

Nanded ; राज्यस्तरीय राजपूत वधू–वर परिचय संमेलनात ५०७ तरुण–तरुणींचा सहभाग, नांदेडमध्ये सामाजिक विक्रम

December 23, 2025

Deputy Chief Minister Ajit Pawar : “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू”

January 28, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Panganga river In Mahur : माहूर जवळील पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळू उपसा सुरुच -NNL

Voting awareness : चिमुकल्यांची पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती -NNL

Cleanliness is Service” ; “स्वच्छता ही सेवा” एक दिन एक घंटा एक साथ अभियानांतर्गत नांदेड विभागात भव्य श्रमदान मोहीम

Admin sir! Admin your group only! अॅडमीन साहेब ! तुमचा ग्रुप ओन्ली अॅडमीन करा ! -NNL

Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?