Vamandada Kardak ; महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा उत्साहात – NNL

नांदेड | अनु.जाती/जमाती/विजा -भज /इ.मा.व./वि.जाप्र /शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटना मंत्रालय मुंबई भारत वानखेडे प्रणित शाखा सांस्कृतीक  नांदेड जिल्हाच्या वतीने  महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा  दि.३१ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला असून यावेळी शहरी व ग्रामीण नामवंत कलावंतांना मी भिम क्रांतिचा नारा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

 पीपल्स कॉलेज येथील नरहर कुरुंदकर सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमास धर्मगुरू भदंत पय्यांबोधी थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून संगीता डक यांच्या हस्ते उद्घाटन झाले अध्यक्षस्थानी संघटनेचे महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे प्रवक्ता सुभाष लोणे, सांस्कृतिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे,माधव जमदाडे, डॉ विलास भद्रे आदिंची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम भ.तथागत बुध्द डॉ बाबासाहेब आंबेडकर व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पूज्य भंदत पय्यांबोधी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले.यानंतर धर्मगुरू व मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यात सामाजिक व सांस्कृतिक चळवळित भरिव योगदान देणाऱ्या ……यांना मी भीम क्रांतिचा नारा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी मान्यवरांची वामनदादा व त्यांचे गित यावर प्रकाश टाकणारे समायोचित भाषणे झाली.यावेळी ग्रामीण व शहरी कलावंतांनी वामनदादाचे एका पेक्षा एक सरस अशी गिते सादर करुन  आपली कला सादर केली पहिल्यांदा ग्रामीण कलावंतांना शहरात एक भव्य कार्यक्रमात संधी मिळाली एव्हढेच नाही तर या सर्व कलावंतांचा प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे व जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांच्या पुढाकाराने मान्यवरांच्या हस्ते  त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  आयोजक  गंगाधर वडणे, सचिव कनिष्क सोनसळे,उपाध्यक्ष अंकुशराज चित्ते,विश्वनाथ चिंतोरे, सहसचिव शिध्दोधन कदम, कृष्णा गजभारे, प्रसिद्धी प्रमुख माधव अटकोरे,सोपान गायकवाड,देवानंद धुळधुळे, सल्लागार नामदेव इंगळे, भिमराव लोणे,शषराव वाघमारे, संदिप डावरे, शामराव वाघमारे, बाबुराव कपाळे,कैलास पोळेराव,नामदेव लोणे आदी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांनी केले सुत्रसंचलन राष्ट्रपाल नरवाडे यांनी तर सचिव कनिष्क सोनसळे यांनी आभार मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामीण कलावंत व कलाप्रेमी उपस्थित होते

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button