हिमायतनगर,अनिल मादसवार| दिनांक 15/10/2024 मा. निवडणूक आयोग यांचे पत्रकार परिषदेनंतर तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने आपण आदर्श आचारसंहितेचे पालन करावे व आपले दिनांक 16/10/2024 रोजीचे नियोजित बेमुदत थाळी नाद आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. असे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्ते कॉम्रेड दिगंबर काळे यांनी दिली आहे.
हिमायतनगर येथील लोक विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड दिगंबर काळे, हिमायतनगर कॉम गणेश रचेवाड, नवीन कुमार मादसवार, गंगाधर गायके यांनी दिनांक 29/09/2024 ते 30/09/2024 च्या बेमुदत धरणे आंदोलन केले होते. यातील प्रमुख उर्वरित प्रश्न व मागणीसाठी तहसीदार तथा अध्यक्ष यांच्या परमेश्वर मंदिर ट्रस्टसमोर दिनांक 16/10/2024 रोजी शासनाच्या विरोधात बेमुदत थाळी नाद आंदोलन करीत असल्याचे पत्र डेप्युटी कलेक्टर महेश वडदकर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नावाने दिले आहे.
आज आंदोलन होणार असल्याचे लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासनाने हिमायतनगर तालुक्यातील दिव्यांग निराधार आणि शेतकरी यांच्या अडचणी संदर्भात असलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्या निवेदनात नमूद बाबीच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या स्तरावरील मागणी संदर्भात निवेदनकर्ते यांना अवगत करण्यास्तव कळविले आहे. मागणी क्रमांक 01 च्या अनुषंगाने शहरातील प्राप्त अर्ज नुसार जॉब कार्ड वाटप नगरपंचायत कार्यालयात सुरु आहे. तसेच मागणी क्रमांक 02 अन्वये नगरपंचायत हिमायतनगर तर्फे आयोजित बैठकीनुसार जागाभाडे धारकांना नमुना नंबर 43 देण्याच्या कार्यवाहीचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांना पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आला आहे.
निवेदनातील संदर्भाने असलेल्या मागण्यासाठी यापूर्वीच कार्यवाही सुरु झाली असून, तसेच दिनांक 15/10/2024 मा. निवडणूक आयोग यांचे पत्रकार परिषदेनंतर तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने आपण आदर्श आचारसंहितेचे पालन करावे व आपले दिनांक 16/10/2024 रोजीचे नियोजित बेमुदत थाळी नाद आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंति पत्र देण्यात आल्याने बुधवारी होणारे बेमुदत थाळी नाद आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी तहसील स्तरावरील व गावठाण जागेचे मालकी प्रमाणपत्र न मिळाल्यास आचारसंहिता संपल्यानंतर आमही आमचे आंदोलन पुन्हा सुरु करू असा इशाराही कॉम्रेड दिगंबर काळे यांनी दिला आहे.