हिमायतनगर, अनिल मादसवार| पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामात मोठा अपहार व गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे गावकर्यांनी नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे देऊन चौकशीची मागणी केली. तसेच आमरण उपोषण केले, लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेण्यात आले मात्र चौकशी अजूनही गुलदस्त्यात आहे. हि बाब हेरून एकंबा ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करूण ग्रामसेवक निलंबनाची कार्यवारी करा अशी मागणी दत्ता गणपतराव शिराणे अनुसूचित जाती मोर्चा हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या अधिकारी, पदाधिकारी यांनी संबंधित विभागाचे अभियंता यांना हाताशी धरून राबविलेल्या शासकीय नळ योजना कागदोपत्री बनवून पैसे उचलले आहेत. तसेच गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी फिल्टर, अंगणवाडीतील साहित्य, गावातील नाल्या बांधकाम यासह सर्व शासकीय योजना कागदोपत्री दाखवून परस्पर रक्कम उचलली आहे. याबाबतचे सर्व पुराव्या साहित्य लेखी तक्रार गावकर्यांनी नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे कारून चाकासशीची मागणी केली होती . मात्र यःची दखल घेतली नसल्याने दिनांक ०७ पासून गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आमरण उपोषण सुरु होताच गटविकास अधिकारी जाधव यांनी भेट देऊन उपोषण करू नका आम्ही चौकशी करू असे लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित झाले. यास आठ दिवस लोटले असताना चौकशी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
एकंबा गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यानी संबंधित विभागाचे अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री कामाचे अंदाजपत्रक तयार करून सन 2022 -2023 व माहे ऑगस्ट 2024 या कालावधीत शासनाचा आलेला निधी परस्पर उचलुन घेतला आहे. गावांत कोणत्याही प्रकारचे वरील प्रमाणे कामे केलेली नाहीत. या सर्व विकास कामाची व तसेच ग्रामसेवक खिल्लारे यांची खालेनिहाय चौकशी करुण, त्यांचेवर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड याना देण्यात आल्या आहेत.