Vamandada Kardak ; महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा उत्साहात – NNL
नांदेड | अनु.जाती/जमाती/विजा -भज /इ.मा.व./वि.जाप्र /शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई भारत वानखेडे प्रणित शाखा सांस्कृतीक नांदेड जिल्हाच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा दि.३१ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला असून यावेळी शहरी व ग्रामीण नामवंत कलावंतांना मी भिम क्रांतिचा नारा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
पीपल्स कॉलेज येथील नरहर कुरुंदकर सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमास धर्मगुरू भदंत पय्यांबोधी थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून संगीता डक यांच्या हस्ते उद्घाटन झाले अध्यक्षस्थानी संघटनेचे महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे प्रवक्ता सुभाष लोणे, सांस्कृतिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे,माधव जमदाडे, डॉ विलास भद्रे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम भ.तथागत बुध्द डॉ बाब...
