नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व उत्कर्ष व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालय सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सी-झोन ॲथलेटिक्स स्पर्धेवर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी सुवर्णपदकानी विजय मोहोर उमटविली. त्यामध्ये बी.ए.द्वीतीय वर्षाच्या कु.सुकन्या होगे हिने ८०० मी. १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त केले. बी.ए. प्रथम वर्षाच्या कु. अनुराधा पिंपळे हिनेही शंभर मीटर धावणे व लांब उडी या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त केले.


त्याबरोबरच बी.ए. प्रथम वर्षाच्या कु.सुलोचना झडे या विद्यार्थिनीने ४०० मीटर धावणे यात गोल्ड मेडल आणि २०० मीटर धावणे यामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले. बी.ए. तृतीय वर्षाच्या कु.वैष्णवी दुधमल या विद्यार्थिनीने ५००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल प्राप्त केले. महाविद्यालयाच्या रिले संघाने १००×४०० या रीले क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त केले.


या यशाबद्दल श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव, कोषाध्यक्ष ॲड.प्रा.श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार,उपप्राचार्य डॉ.व्ही.आर.राठोड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण विभागप्रमुख व प्रभारी क्रीडा संचालक डॉ.साहेबराव मोरे आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा.डॉ.राहुल सरोदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.




