नांदेड l महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा 26 वा वर्धापन दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता जिल्हा मेळावा आज 15 ऑक्टोंबर बुधवार रोजी दुपारनंतर 5.वाजता शिवाजी नगर येथील विसावा हाॅटेल मध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


या मेळाव्याचे उद्घाटक आमदार बालाजीराव कल्याणकर असून आमदार श्रीजया चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आनंदराव बोढारकर राहणार असून प्रमुख उपस्थिती मराठी पत्रकार संघाचे संतोष पांडागळे,पत्रकार संघाचे सल्लागार गोवर्धन बियाणी, सायन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, म.स.पा.चे अध्यक्ष बालाजी इबितदार,काॅ. प्रदीप नागापूरकर, म.रा.वृतपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, वाचक प्रतिनिधी एड श्यामसुंदर वाकोडे, विनय गिरडे पाटील यांची राहणार आहे.दुपारी नंतर चार वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान येथील संघटनेच्या कार्यालयातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.


यावर्षीचा सन्मानाचा मानला जाणारा कामगार नेते अनंतराव नागापूरकर यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ संपादक, पत्रकार श्री शंतनु डोईफोडे यांना तर वृत्तपत्र विक्रेता संघटक राज्यस्तरीय पुरस्कार शंकरराव गंगाधरराव संगेवार (मुखेड) यांना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिल्या जाणार आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार, गुणवंत पाल्याचा सत्कार तसेच विविध कार्यक्रमांसह वृत्तपत्र विक्रेत्याचे परिवारासह स्नेह गेट टुगेदर उत्साहात होणार आहे.


तरी जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगांवकर,कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, सल्लागार सरदारसिंह सुर्यवंशी (चौहान)भागवत गायकवाड, बालाजी चंदेल, गणेश जुजाराव ,संदिप कटकमवार , दिपक नरवाडे, सत्यनारायण देवरकोंडा, दिपक तिडके , बालाजी सुताडे, अनुप ठाकुर, विठ्ठल फडेवार , अवधूत पसलवाड, विनायक आंधे, शंकर हुस्से, आदी यांनी केले आहे.




