नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील वसरणी साईबाबा मंदिराच्या परिसर व शंकर नगर , पंचवटी या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त निवासस्थानाचे अद्यापही पुरामुळे पंचनामे झाले नाहीत हे तात्काळ करण्यात यावे याबाबत व नुकसान भरपाई मिळावी यासाठी मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ऊबाठा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख ॲड.अक्षय वटमवार यांच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्त महिला युवक नागरिक यांनी निवेदन देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.


नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी येथील शंकरनगर भागात वास्तव्य असुन संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे आमच्या घरामध्ये पाणी घुसल्याने जिवनाशयक वस्तू व संसार उपयोगी वस्तूची नासधुस होऊन लाखों रूपयांचे नुकसान झाले परंतु प्रशासन अद्याप याचा पंचनामा सुद्धा केला नाही ,अखेर या संदर्भात वसरणी भागातील 28 ऑक्टोबर रोजी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे भर वसाहतीत तब्बल पाच ते सात दिवस घरे पाण्याखाली गेल्याने हाहाकार उडाला होता, परंतु मनपा व महसूल प्रशासनाने पंचनामा व मदत केली नाही,.


अखेर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील ऊबाठा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख ॲड.अक्षय वटमवार यांच्या नेतृत्वाखाली उपशहरप्रमुख गजानन शेषेराव शास्त्री, गौरव दरबस्तवार, शाखा प्रमुख श्रीनिवास सारले मुकेश कडेकर,भोंलु उबाळे, कृष्णा कडेकर यांच्या सह परिसरातील महिला यमुनाबाई गरूडे,अंजनाबाई हालीकर, महानंदा स्वामी, गंगाबाई सारले ,शामा स्वामी, लक्ष्मी कावळे, गंगाबाई भातनाते, मथुरा बाई कुंडदे,सारिका कुंडदे, लक्ष्मीबाई ऊदगिरवाड, कमलबाई साबणे, इंदुबाई मसकटवार,ऊषा झाडे,अनिता वैघ, मिराबाई वैध,कविता चव्हाण, करूणाबाई परमार, अमरसिंह ठाकूर,भारतीतीबाई ठाकूर,राम चव्हाण,रेणुका वैध,आकाश सिंह ठाकुर, अब्दुल खालैद महंमद , गजानन बंकुवाले ,रोशनी बगेरीया, फराना बेगम, यांचा सह परिसरातील अनेक महिला सहभागी होऊन सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे वसुली लिपीक ऊतम जौधंळे यांना निवेदन देऊन घरातील फोटो, आधार, देण्यात आले आहे, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.




