MLA Chikhlikar : आमदार चिखलीकर आरोग्य सेवेसाठी एक्शन मोडवर

लोहा| माझे कोणी ऐकत नाही मी काय करू, डॉक्टर वेळेवर येत अशी हतबलता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,जिल्हा शल्यचिकित्सक याच्यासमोर रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ बारी यांनी व्यक्त केली. लाखो रुपयांची साधनसामुग्री असूनही ती धूळखात पडून आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत पण ते ड्युटी सोईनुसार करतात. रुग्णाची होणारी प्रचंड हेळसांड सुरू आहे. यापूर्वी सूचना देऊनही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संबंधिताना झापले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पेरके यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व सर्व विभागाची चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला.

उपजिल्हा रुग्णालय असूनही प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी अवस्था झालेल्या या रुग्णालयातील डॉक्टर महिन्यात फक्त चार -पाच वेळा हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर येतात आणि मेडिकल सुप्रीडेंट सुद्धा सोयीनुसार येत असतील तर हॉस्पिटल यंत्रणेला दुर्धर आजार झाल्याचे समोर आले आहे. लोहा उपजिल्हा रुग्णालया नियामक मंडळाची बैठक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे जिल्हा शक्यचिकित्सक डॉ पेरके, तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार बिडिओ पाटील, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मोहन पवार, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता शिवाजी राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ अब्दुल बारी, रुग्णालय सेवा समितीचे सदस्य मारुती पाटील बोरगावकर, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, दता वाले, भास्कर पाटील, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, उभरते युवा नेतृत्व बंडू पाटील वडजे, सूर्यकांत गायकवाड, प्रा डॉ डी एम पवार, बी डी जाधव भानुदास पवार, इजि सूर्यवंशी यासह पदाधिकारी उपस्थित होते.


लोहा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर हे महिन्यातुन चार वेळा फक्त एक दिवस ड्युटी करतात. स्पेशालिस्ट असूनही येथे ऑपरेशन होत नाही. हाडाचे, तसेच सिजर , यासह अन्य रोगाचा इलाज वेळवर होत नाही रुग्ण वाहिका सुद्धा वेळेत रुग्णाला मिळत नाही. लाखो रुपयांची यंत्र सामुग्री धूळखात रूम बंद आहेत, रुग्णाची प्रचंड हेळसांड, प्रमाणपत्र मिळत नाही. ओपिडी साठी डॉक्टर वेळेत येत नाहीत स्पेशालिस्ट डॉक्टर असून काहीच उपयोग नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी अवस्था या उपजिल्हा रुग्णालयाची आहे असा असंख्य तक्रारीचा पाढा रुग्ण व नातेवाईक येऊन मांडत आहेत असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगताच वैद्यकीय अधीक्षक डॉ बारी यांची माझे कोणीच ऐकत नाही. डॉक्टर वेळेत येईनात ड्युटी करत नाही असा अनेक समस्या मांडत हतबलता व्यक्त केली. उपस्थित असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पेरके हे ऐकून आवक झाले रुग्णालयात सावळा गोंधळ आणि प्रशासनातील फोलपणा त्यांना दिसला.

आमदार चिखलीकर यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव याना उपजिल्हा रुग्णालयाची वस्तूस्थिती व्हिडीओ कन्फरन्स द्वारा दाखविली आठ तास डॉक्टराच्या ड्युटी तसेच ऑपरेशन व सर्व सुविधा उपलब्ध करावा आणि रुग्णांना दिलासा द्या असे सांगितले. जिल्हा शक्यचिकित्सक डॉ पेरके यांनी रुग्णालयाचे मेडिकल सुप्रीडेंट व डॉक्टर विभाग प्रमुख याची चौकशी आदेश दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभार कसा मनमानी सुरू आहे हे पाहून व ऐकून खुद्द जिल्हा शक्यचिकित्सक आवक झाले आहेत. आमदार चिखलीकर यांनी एक महिन्यात सुधारणा करा अन्यथा कार्यवाहिला सामोरे जा असा सज्जड इशारा दिला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button