Wednesday, May 13

Tag: in action mode

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर अखेर महसूल प्रशासनाने कंबर कसत थेट धडक कारवाई सुरू केली आहे. केवळ पाच दिवसांत एक हायवा, दोन ट्रॅक्टर अशी तीन अवैध रेती वाहतूक करणारी वाहने जप्त करून महसूल पथकाने रेती माफियांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या कार्यवाहीने हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असल्याने गौण खनिज माफियात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी बी.एम. चव्हाण यांनी वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, हिमायतनगर तहसीलच्या तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या स्पष्ट आदेश व मार्गदर्शनाखाली पळसपूर शिवारासह तालुक्यातील विविध ठिकाणी मध्यरात्री सापळे रचून कारवाया केल्या आहेत. दिनांक ४, ५ व ७ फेब्रुवारीच्या रात्री पळसपूर परिसरात अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तात्काळ जप्त करण्यात आले आहे. माग...
MLA Chikhlikar : आमदार चिखलीकर आरोग्य सेवेसाठी एक्शन मोडवर

MLA Chikhlikar : आमदार चिखलीकर आरोग्य सेवेसाठी एक्शन मोडवर

आरोग्य, नांदेड, राजकीय
लोहा| माझे कोणी ऐकत नाही मी काय करू, डॉक्टर वेळेवर येत अशी हतबलता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,जिल्हा शल्यचिकित्सक याच्यासमोर रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ बारी यांनी व्यक्त केली. लाखो रुपयांची साधनसामुग्री असूनही ती धूळखात पडून आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत पण ते ड्युटी सोईनुसार करतात. रुग्णाची होणारी प्रचंड हेळसांड सुरू आहे. यापूर्वी सूचना देऊनही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संबंधिताना झापले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पेरके यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व सर्व विभागाची चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला. उपजिल्हा रुग्णालय असूनही प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी अवस्था झालेल्या या रुग्णालयातील डॉक्टर महिन्यात फक्त चार -पाच वेळा हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर येतात आणि मेडिकल सुप्रीडेंट सुद्धा सोयीनुसार येत असतील तर हॉस्पिटल यंत्रणेला दुर्धर आजार झाल्याचे सम...
error: Content is protected !!