MLA Chikhlikar : आमदार चिखलीकर आरोग्य सेवेसाठी एक्शन मोडवर
लोहा| माझे कोणी ऐकत नाही मी काय करू, डॉक्टर वेळेवर येत अशी हतबलता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,जिल्हा शल्यचिकित्सक याच्यासमोर रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ बारी यांनी व्यक्त केली. लाखो रुपयांची साधनसामुग्री असूनही ती धूळखात पडून आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत पण ते ड्युटी सोईनुसार करतात. रुग्णाची होणारी प्रचंड हेळसांड सुरू आहे. यापूर्वी सूचना देऊनही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संबंधिताना झापले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पेरके यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व सर्व विभागाची चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
उपजिल्हा रुग्णालय असूनही प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी अवस्था झालेल्या या रुग्णालयातील डॉक्टर महिन्यात फक्त चार -पाच वेळा हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर येतात आणि मेडिकल सुप्रीडेंट सुद्धा सोयीनुसार येत असतील तर हॉस्पिटल यंत्रणेला दुर्धर आजार झाल्याचे सम...
