HomeनांदेडFormer Deputy Mayor Satish Deshmukh : नांदेड शहरातील नागरी समस्या घेऊन ‌माजी...

Former Deputy Mayor Satish Deshmukh : नांदेड शहरातील नागरी समस्या घेऊन ‌माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी घेतली आयुक्तांची ‌भेट -NNL

नांदेड| शहरातील अनेक नागरी समस्या घेऊन माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेतली. नागरी समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी त्यांना दिले आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे व कट पॉइंट हे धोकादायक बनलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. मुख्य रस्त्यावरील बंद पडलेले स्ट्रीट लाईट व नवीन वसाहतीमध्ये पाहिजे असलेले नवीन स्ट्रीटलाईट याकडेही लक्ष वेधले. मुख्य रस्त्यावर अनेक झाडे धोकादायक स्थितीमध्ये लोंब कळत आहेत.त्यामुळे काही दिवसापूर्वी निष्पाप मुलाला आपला जीव गमावा लागला होता. गोदावरी नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे व वाढलेल्या जलपर्णीमुळे गोदावरी प्रदूषित होत आहे. भव्य क्रीडा संकुल असून सुद्धा त्याचा वापर क्रीडा प्रेमींना करता येत नाही. सांस्कृतिक सभागृह असून त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करणे गरजेचे आहे अशा समस्या व्यक्त केल्या. ‌

मनपा आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरून कट पॉईंट तात्काळ दुरुस्त केल्या जातील. धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. बंद पडलेल्या स्ट्रीटलाईट तात्काळ दुरुस्त केल्या जातील व नवीन स्ट्रीट लाईट साठी लवकरात लवकर टेंडर काढून नवीन स्ट्रीट लाईट बसविल्या जातील. गोदावरी नदीतील जलपर्णी काढून ड्रेनेजचे पाणी नदीमध्ये जाणार नाही क्रीडा संकुल व सांस्कृतिक सभागृहासाठी शासनाकडून निधीची व्यवस्था करून त्यांचे नुतनीकरण केल्या जाईल असा शब्द आयुक्तांनी दिला. ‌ ‌‌ ‌ ‌

ह्या समस्या सोडवण्यासाठी जनतेचे सहकार्य मिळवून दिल्या जाईल असे भूमिका सतीश देशमुख यांनी मांडली. सतीश देशमुख यांनी 5 ऑगस्ट पासून सुरू केलेल्या नांदेड उत्तर परिवर्तन संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संघटनेच्या सहकार्यातून सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments