HomeकरियरDrug-Free Youth : 'नशामुक्त युवा – विकसित भारत' संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;...

Drug-Free Youth : ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

नांदेड | भारत सरकारच्या मेरा युवा भारत (MY Bharat) नांदेड यांच्या वतीने आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या सहकार्याने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात पार पडले. २ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले असून, २०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड तसेच जिल्हा युवा अधिकारी अशनी अनिल कनकटे प्रमुख उपस्थित होते.

थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील युवकांना व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी पुढील १०० रविवार विविध जनजागृती उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ संकल्पाची शपथ घेतली.

यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी युवकांची सामाजिक जबाबदारी, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. मारोती गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

जिल्हा युवा अधिकारी अशनी अनिल कनकटे यांनी व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक चळवळ असल्याचे सांगत, प्रत्येक युवकाने समाजात जनजागृती करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

nasha 2 Drug-Free Youth : 'नशामुक्त युवा – विकसित भारत' संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे बंडू कांबळे, सिस्टीम एक्सपर्ट विभागाचे विजय हनवते, सह्याद्री पगडे, नरसिंग कागडा तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

nasha 1 Drug-Free Youth : 'नशामुक्त युवा – विकसित भारत' संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

माय भारतच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण झाली असून, ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला बळकटी मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments